Skip directly to content

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी :

मंटूची होडी

मंटू बेडकी तलावात राहते. तलावात मासे आहेत. ते पकडायला माणसे होडी घेऊन येतात. मंटूलाही होडीत बसायचे आहे. पण माणसांजवळ जायला ती घाबरते. आज तिने ठरवले की काहीही झाले तरी होडीत बसायचेच. आपण आपलीच होडी बनवू या. तिने नारळाची करवंटी आणली. करवंटीला पानाचे शीड जोडले आणि तिची होडी तलावात ढकलली. होडीत बसून हलत डुलत मंटू तलावात फिरू लागली. तोच जोराचा वारा सुटला. होडी उलटली आणि मंटू तलावात पडली. जोरात पाय हलवत तिने बुडी मारली. मंटूला होडीची सफर खूप आवडली.
 
१. मंटू बेडकी कुठे राहते ?
२. तिला होडीत का जाता येत नव्हते ? 
३. तिने होडी कशी बनवली ?
४. होडी उलटल्यावर मंटू घाबरली असेल का ?
 
 

कौशीची फजिती

तलावा काठी झाडावर कौशी माकडीण रहायची. कौशीला आज झाडावर बसायचा कंटाळा आला होता. ती खाली उतरली. ऐटीत चालत चालत तलावाकडे गेली. तिथे एक माणूस शेंगा खात बसला होता. कौशीने हळूच माणसाजवळची थैली पळवली. तो माणूस हातात दगड घेऊन धावला. कौशीने झाडावर धाव घेतली. ती उंच फांदीवर जाऊन बसली. तिने थैलीतून शेंगांची पुडी काढली. आणि उघडून बघते तर काय? आत एकही दाणा नाही. नुसती शेंगांची सालंच उरली होती.

1. कौशी कुठे रहायची?

2. आज झाडावरून का उतरली?

3. माणूस कौशीच्या मागे का धावला?

४. कौशीची फजिती कशी झाली?

चिनू मिनू

खूप पाऊस पडत होता. चिनूला खेळायला बाहेर जायचं होतं. तो पाऊस थांबायची वाट पाहत होता. पण पाऊस काही थांबेना. चिनूला खूप कंटाळा आला होता. इतक्यात कुंडीतल्या झाडावरून आवाज आला, "माझ्याशी खेळायला येशील?" चिनू दचकला. बघतो तर काय एका छोटीशी अळी! चिनूने अळीला विचारलं, "तुझं नाव काय?" "मिनू!" अळीने उत्तर दिलं. "अरे वा! माझं नाव चिनू! चिनू आणि मिनू! मज्जा!" 
 
चिनू आणि मिनूची गट्टी जमली. चिनू शाळेतून आला की मिनू खेळायला यायची. दोघे खूप खेळायचे. मिनू लपायची. चिनू तिला शोधायचा. मिनू पळायची. चिनू पकडायला जायचा. कधी दोघे शर्यत लावायचे. 
 
एक दिवस चिनू शाळेतून आला. पण मिनू खेळायला आलीच नाही. चिनूने इकडे शोधलं,

बाजार

काल सोमवार होता. आनगावला आठवडी बाजार होता. कृपा आईबरोबर बाजारात गेली. आईने बाजारात विकायला टोपलीभरून भाजी बरोबर घेतली.टोपलीत वांगी होती, भेंडी होती आणि थोडी काकडीपण होती. आई पुलापाशी झाडाखाली भाजी विकायला बसली. थोडे पैसे घेऊन कृपा बाजारात गेली. तिने दुकानातून लाल रीबीन घेतली. पाढे लिहायला चौकटीची वही घेतली. पेनाची रिफिल घेतली. मग ती आईबरोबर भाजी विकायला बसली. बाजारातून निघताना आईने कांदे, हळद, मसाला आणि बाबासाठी औषधं घेतली. कृपा आईबरोबर जीपगाडीतून घरी आली.
 
१. आईने बाजारात विकायला काय काय घेतले ?
२. कृपाने बाजारात काय काय घेतले ?
३. आनगावचा बाजार नदीकाठी भरत असेल का ? कशावरून ?
४. कृपाच्या घरी

भेंडी कशी दिली?

“भेंडी कशी दिली ?’’
“पाच रुपये पाव.’’
“ताजी आहे का ?’’
“हो, तुम्हीच बघा की.’’
“बरं, अर्धा किलो द्या.’’
“अजून काय देऊ ?"
"अजून काही नको." 
"आलं, मिरची, लिंबू काय देऊ ?’’
“बर, लिंबं द्या दोन.’’ 
“घ्या, सगळे मिळून बारा रुपये झाले.’’
 
 

बी लावलं

आम्ही एक बी लावलं. त्याला पाणी घातलं.
एक कोंब आला. दोन पानं आली. वेल वाढली. 
कळी आली. फूल उमललं. फळ आलं. 
एवढं झालं, 
एवढं झालं,
एवढं झालं, 
एवढं झालं!
 
 
 

धामण आणि साळुंक्या

सीता आजीच्या घरामागे खूप झाडं आहेत. तिने परसात काही भाज्या पण लावल्या होत्या. त्या झाडीत बुलबुल, पोपट, तितुर साळुंक्या असे बरेच पक्षी येत. सीता आजी एक दिवस भाजी बनवत होती. तिने भाजीला फोडणी दिली आणि शिजण्यासाठी झाकणी ठेवली. तेवढ्यात तिला साळुंक्यांचा आवाज आला. तशा त्या नेहमीच कलकल करत पण आज साळुंक्यांचं ओरडणं फारच वाढलेलं आहे, हे तिच्या लक्षात आलं. आजी उठली आणि घरामागे गेली. बघितलं तर काय, परसात एक मोठा साप! मोठी धामण होती ती. साळुंक्या आणि धामण एकमेकांवर झडप घालत होत्या. साळुंक्या ओरडत ओरडत धामणीवर झडप घालत आणि धामण मान उंचावून साळुक्यांवर झडप घाले. साळुंक्या चतुर.

दोन वरसगाव

“दोन वरसगाव द्या.’’
“अहो ही बस नांदगावची आहे. वरसगावला नाही जात.”
“अरे ! आता काय करायचं ?’’ 
“आता पुढच्या स्टॉपला उतरा आणि या परत.” 
“अहो आताच थांबवा की बस.” 
“नाही. बस मध्येच थांबणार नाही. चला, तिकिटचे पैसे द्या.” “तिकीट काढावं लागेल ?” 
“मग ? चुकीच्या बसमध्ये बसलं तरी तिकिट काढावंच लागतं.”

दोरीवर चढू या !

शिबिरातल्या ताईनं एके दिवशी सांगितलं की, "उद्या आपण दोरीवर चढण्याचा खेळ खेळायचाय." ते ऐकून मनू म्हणाली, "हा कसला खेळ? दोरीवरच्या उड्या असतील का?" तिनं मनजीतला विचारलं. तो म्हणाला, "अगं, दोरीवरच्या उड्या मारताना आपण दोरीवर कुठे चढतो?" मग मनूनं वाजिदला विचारलं. पण त्यालाही हा खेळ माहिती नव्हता.
 
दुसर्‍या दिवशी मनू मैदानावर आली. तिनं पाहिलं, एका उंच झाडाला गाठी-गाठींची एक दोरी बांधली होती. ताईनं सांगितलं की या दोरीवर एकेकानं चढायचं आहे. पहिला नंबर ज्युलियाचा होता. तिनं हातात दोरी पकडली. पायाच्या बोटांनी दोरी पकडण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला ते जमेचना. शेवटी खूप मदत केल्यावर ज्युलिया दुसर्‍या

कागदाचे कपडे

आज दुपारी मनूच्या शिबिरात गंमतच झाली. ताईनं प्रत्येक गटाला थोडी पेपरची रद्दी दिली. तिनं सांगितलं, "या कागदांपासून तुम्ही छान ड्रेस तयार करायचा आणि कोणाला तरी तो घालून छान नटवायचं". झालं ! सगळे कामाला लागले.
 
मनूच्या जास्वंद गटात मनूच सगळ्यात लहान होती. सगळ्यांनी ठरवलं, आपण मनूलाच नटवू या. अमितदादा कात्री, स्टेपलर, डिंक असं सामान घेऊन आला आणि काम सुरू झालं. 
 
वाजिदनं भराभर मनूची मापं घेतली. कागदावर एक छानसा फ्रॉक बेतला आणि कात्रीनं कापला. ज्युलियानं कागदाचीच सुंदर पर्स आणि कॅप बनवली. एका बाजूला बसून वनशा कागदाचे दागिने बनवत होता. हातात घालायला बांगड्या, गळ्यातलं, अंगठी असं खूप काही त्यानं तयार