Skip directly to content

लेख : गणित शिक्षण

बालवाडीतील गणित

बालवाडीत येणार्‍या मुलांसाठी गणिताचा कार्यक्रम आखताना सामान्यपणे अंक परिचयावर व पाठांतरावर भर देण्यात येतो. पालक, शिक्षक या दोघांच्याहीकडून मुलांनी अंकचिन्ह लक्षात ठेवणे व उजळणी म्हणणे, अशा अपेक्षा असतात. मात्र गणितातील संकल्पना समजणे, तर्क करण्याची क्षमता विकसित होणे, यांवर फारसे लक्ष दिले जात नाही. खरे तर गणित शिक्षणात, निदान बालवाडीच्या तरी, संकल्पना स्पष्ट होणे व तर्कसंगत विचाराला सुरूवात होणे, यांवर भर असायला हवा.

मुलांचे गणित शिक्षण : काही अनुभव

महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यात डहाणू हा आदिवासी-बहुल तालुका आहे, या तालुक्यातील ऐने या गावात ग्राममंगल या संस्थेची आदिवासी मुलांची शाळा आहे या शाळेतील मुलांना गणित शिकवण्याची संधी मला मिळाली.