Skip directly to content

Visitors @ QUEST : from 'Sondara Gurukulam' (Dist. Beed)

Visitors @ QUEST
दिनांक 8-11-17 रोजी बीड येथील ‘सोनदरा गुरुकुलम्’ च्या 18 कार्यकर्त्यांनी क्वेस्टला भेट दिली. दिवसाची सुरुवातच दमदार झाली – गोष्टरंगच्या टीमने तीन गोष्टी सादर केल्या. पाहुणे आणि त्यांची मुलं या सर्वांनाच खूप मजा आली! नंतर क्वेस्टचे प्रोजेक्ट ऑफिसर अतुल गायकवाड यांनी क्वेस्टच्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. प्रत्यक्ष काम पाहण्यासाठी पाहुण्यांना देवगाव आश्रमशाळेत नेलं. तिथे बालभवन, सक्षम व लायब्ररी हे तीन कार्यक्रम पाहिले. त्यांना हे सर्व कार्यक्रम खूपच आवडले. या कार्यक्रमात 'पूर्वनियोजन' केल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम राबवताना येणारी सहजता या गोष्टीची त्यांनी विशेष दखल घेतली व त्यांच्या कार्यक्रमात याचा निश्चित उपयोग करता येईल असं त्यांनी सांगितलं.
Teachers and staff from 'Sondara Gurukulam' (Dist. Beed) spent a day at QUEST on Nov. 8, 2017. The day began with energetic story presentations by the GoshtaRang team. Then Project Officer Atul Gaikwad gave them an orientation about QUEST's programs and projects. They visited Devgaon Ashram Shala, where QUEST runs a Balbhavan as well as Saksham and Library activities. The visitors found QUEST's work quite inspiring and said that they got some useful tips about how prior preparation can help them impart quality education!