Skip directly to content

Training of 'Shikshak Sahayogis, Nov. 12, 2017, Pune

QUEST, Pune City Connect, Sarva Shiksha Abhiyan (SSA) and Pune Municipal Corporation's Education Department have undertaken the 'Saksham' program for students who are falling behind in their studies. For the last year and a half, the program was tried out in 13 model schools. From June 2017, it has been extended to 206 schools of Marathi and urdu medium. For this extension, around 37 'Shikshak Sahayogis' are being trained. The training is mainly on how to train teachers in carrying out the 'Saksham' program, and to provide onsite support.

During the training conducted on Nov. 12 by Archana Kulkarni and Nitin Marade, the focus was on how to observe classes in progress and how to provide onsite support to teachers. The 'Sahayogis' shared their experiences of recent classroom observations and their challenges. Ms. Randhave of SSA spoke to the participants briefly and explained the imapct of 'Saksham' program in the 13 model schools so far.

क्वेस्ट, Pune City Connect, सर्व शिक्षा अभियान व महानगरपालिका शिक्षण मंडळ (पुणे) यांचा संयुक्त प्रकल्प - सक्षम - अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी खास चालवण्यात येतो आहे.  हा १३ मॉडेल स्कूल्समध्ये गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्याचे extension म्हणून पुणे महानगरपालिकेच्या २०६ मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये जूनपासून सुरू केला आहे. 

साधारण ३७ लोकांची टीम – ज्यात काही DIECPT मधले ट्रेनर्स आणि काही मनपा शाळांमधील शिक्षक आहेत – हे ‘शिक्षक सहयोगी’ म्हणून काम पाहतात. सक्षम कार्यक्रमाचं प्रशिक्षण क्वेस्ट कडून या सहयोगींना दिलं जातं; त्यानंतर हे सहयोगी शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना ट्रेनिंग आणि ऑनसाईट सपोर्ट देतात. १२ नोव्हेंबर रोजी झालेलं प्रशिक्षण हे शाळेत जाऊन शिक्षकांना ऑनसाईट सपोर्ट कसा द्यायचा, त्यादरम्यान कोणकोणते मुद्दे पहायचे याबाबत होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर सहयोगींनी केलेलं वर्ग निरीक्षण व त्या दरम्यान आलेल्या अनुभवाबाबत चर्चा झाली.

सर्व शिक्षा अभियानाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, रंधवे मॅडम यांनी सर्व सहयोगींबरोबर सक्षम कार्यक्रमाबाबत चर्चा केली, व १३ मॉडेल स्कूलमध्ये झालेलं सक्षम चं काम किती सकारात्मक आहे हे सहयोगींपुढे मांडलं.