Skip directly to content

Theatre Workshop for QUEST team Nov. 21-28, 2015

 
नाटक कार्यशाळेचा अहवाल – २०१५-१६
कालावधी- 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2015-16
प्रशिक्षक-    मंदार गोखले (प्रशिक्षक अभिनेते)
                     प्रदीप जोशी (संगीत प्रशिक्षक)
बालमित्रांना व शिक्षकमित्रांना प्रत्यक्ष मुलांबरोबर काम करताना खूप बोलावे लागते. त्यासाठी त्यांच्या कल्पनेला चालना देण्यासाठी कोणत्या प्रकारचे गेम्स घेता येतील, प्रत्यक्ष वर्गात मुलांना गोष्ट सांगताना कशी सांगावी, यासाठी बोलण्याचे स्किल कसे डेव्हलप होईल हा वर्कशॉपचा मुख्य उद्देश होता. 21 नोव्हेंबर 2015 ला सकाळी 10 वाजता वर्कशॉपला सुरवात झाली. प्रदीप सरांनी संगीताचे महत्व सगळ्यांना पटवून दिले. त्यानंतर सा रे ग म प ध नी सा हे स्वर वेगवेगळ्या लयीत म्हणून घेतले. त्या स्वरांवर वेगवेगळ्या Action बसवून घेतल्या. सरांनी सुरांचे वेगवेगळे भाव, स्त्री-पुरुषांच्या उच्चारामध्ये स्वर म्हणताना होणारा बदल सांगितला. दोन दिवसात त्यांनी कर्नाटकी, गुजराती, हिंदी आणि मराठी भाषेतील खूप छान गाणी बालमित्रांना शिकवली. सर्वच गाणी नवीन असल्यामुळे सर्वांनाच ही गाणी खूप आवडली. काही गटांनी गोष्टींवर बसवलेल्या नाटुकलीमध्ये या गाण्यांचा वापर केला.
प्रत्येक दिवसाची सुरुवात योगासनांनी व्हायची, ज्यामध्ये श्वसन क्षमता वाढवणे ह्या दृष्टीने काही आसने शिकवली. जर श्वसन क्षमता चांगली असेल तर मुलांना शिकवतांना थकवा येत नाहीच पण दिवसभर उत्साहही टिकून राहतो. भावनिक व मानसिक संयम यावा यासाठी अनुलोम व विलोम सारखा प्राणायमही शिकवला. त्यानंतर चेह-याच्या स्नायूंसाठी व्यायामाचे प्रकार घेतले. चेहऱ्याचे स्नायू कार्यक्षम झाले की चेह-याच्या हावभावाने मुलांपर्यंत पोहचण्यास मदत होते. आठ दिवसांच्या ह्या शिबिरात निरनिराळे Theatre Games घेतले. एकत्र येऊन काम करणे, पुढाकार घेऊन काम करणे, एकमेकांच्या क्षमता ओळखून एकमेकांना समजून काम करणे, आणि या सर्व गोष्टी आनंदाने हसतखेळत करणे हे शिकायला मिळाले. 
शिबाराचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे आम्ही निरनिराळ्या लेखकांच्या गोष्टी - जसे पाऊस, रस्ता , अट्टूची आंघोळ, राजा शहाणा झाला, एक्की दोक्की - यासारख्या गोष्टींचे सादरीकरण केले. गोष्ट सांगताना ती सर्वप्रथम समजावून घेणे, त्यानंतर ती फक्त आवाज व शरीराचा वापर करून सांगणे, गोष्टीत कार्यशाळेतील एखादा खेळ वापरणे, गाण्यांचा वापर करणे, आपल्या गोष्टीच्या सादरीकरणाची जाहिरात तयार करणे ही पूर्ण प्रक्रिया शिकलो. त्याचबरोबर गोष्ट सांगतांना बोलण्यातले चढ-उतार, pause, महत्त्वाच्या शब्दांवर हलकासा जोर देणे आणि सहज सोप्या पद्धतीने बोलणे - जसे आपण आपल्या मित्राशी गप्पा मारतो तशी ती गोष्ट सहज सांगण्याकडे लक्ष दिले. पात्रांची देहबोली, जागेचा वापर, नेपथ्य, costume, props  ह्या कडेही लक्ष दिले. या सर्व गोष्टींचा वापर करून कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी त्या गोष्टींचे सादरीकरण केले.
या शिबिरात सर्वांनाच खूप मजा आली. कारण शिबिरात भाग घेणा-या सर्वांचा उत्साह खूपच छान होता. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत  सर्वजण प्रत्येक Activity मध्ये जोशाने भाग घेत होता. आणि त्यांच्या या सहभागामुळेच ही नाटक कार्यशाळा उत्तम झाली.
- नितीन मराडे 
 
 
 
 
 
 
 
सहभागी प्रशिक्षणार्थी -
 
रूपाली पाटील, नरेश भोये, हरेश चौधरी,  अनिल लष्कर, अश्वजीत मेश्राम, संभाजी भिसे, विकास वाघमोडे, दिप्ती पिंगळे, नितीन फडवले, ज्ञानेश्वर धानवा, संदीप खुलात, दत्तु वारंगडे, दीपा भेरे, सुनिल शनवारे, चंद्रकांत लहांगे,  अजिंक्य पाटील, समिर म्हसकर, अश्विनी भुनभुने, प्रमोद कांबळे, निलेश मराडे, रश्मी मुसळे, धम्मानंद बोंदाडे, तुकाराम लाळगे, रोहीत चौधरी