Skip directly to content

Teacher training at Ulhasnagar for QUEST-Magic Bus collaborative project

QUEST and Magic Bus Foundation run a collaborative project on level-based learning in Municipal schools at Ulhasnagar. The teachers of these 10 schools participated in a workshop on March 2-3, 2017, on language and math. QUEST’s Project Officer Atul Gaikwad along with team members Tushar Marade and Dhammanand gave training inputs. Project Coordinator from Magic Bus, Rima Sengupta, was also present. The participants appreciated the lesson demonstrations using the specially created Saksham books.

क्वेस्ट आणि मॅजिकबस फाउंडेशन यांच्या वतीने उल्हासनगर महानगर पालिकेच्या १० मराठी शाळांत ‘सक्षम’ हा स्तराधारित कार्यक्रम चालवला जातो. विविध कारणांनी शिक्षणात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वेस्टने खास बनवलेल्या कृती आणि पुस्तके वापरून या मुलांची शैक्षणिक पातळी उंचावता येऊ शकते. त्यासाठी शिक्षकांचा सहभाग मात्र खूपच असावा लागतो. उल्हासनगरच्या कार्यक्रमातील २० सहभागी शिक्षकांचे तिसरे प्रशिक्षण २-४ मार्च, २०१७ रोजी घेण्यात आले. क्वेस्टचे प्रोजेक्ट ऑफिसर अतुल गायकवाड, शिक्षकमित्र तुषार मराडे आणि धम्मानंद, तसेच मॅजिकबस फाउंडेशनच्या रीमा सेनगुप्ता हे या प्रशिक्षणाला उपस्थित होते. भाषा आणि गणिताचे पाठ ‘सक्षम’ची पुस्तके वापरून कसे घावेत याचे प्रात्यक्षिक घेऊन दाखवण्यात आले. शिक्षकांना हे प्रशिक्षण फार उपयोगी वाटले.