Skip directly to content

Samajun Umajoon Workshop: Nov. 17-20, 2015

The Samajoon Umajun workshop on 'Teaching Fractions' was held at Sonale from Nov. 17 to 20. Twenty four teachers from various places in Maharashtra participated in it along with ten QUEST team members. Nilesh Nimkar (Director, QUEST) was the principal resource person, assisted by Pralhad Kathole, Kalpesh Patil and Tushar Marade.

The main topics / themes covered in the workshop were:

1. Aspects of effective Mathematics teaching

2. Fractions on number line

3. Fractions on dots grid

4. Equivalence and comparison of fractions

5. Operations on fractions  

6. Fractions : area model

7. fractions : Ratio meaning

8. Fractions : sharing meaning

The detailed report in Marathi is noted below. 

समजून – उमजून  नोव्हे. 2015 
कार्यशाळा : अपूर्णांक शिकवताना 
कार्यशाळा कालावधी 17 नोव्हें ते 20 नोव्हें 2015 
मार्गदर्शक  : श्री. नीलेश निमकर 
सहाय्यक : प्रल्हाद काठोले, कल्पेश पाटील, तुषार मराडे 
प्रस्तावना : क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट)  सोनाळे आयोजित समजून – उमजून : अपूर्णांक शिकवताना ही कार्यशाळा दि. 17 नोव्हें ते 20 नोव्हें. 2015 दरम्यान घेण्यात आली. या कार्यशाळेत एकूण 34 शिक्षक सहभागी झाले होते.( क्वेस्टचे कार्यकर्ते धरुन ) सामान्यपणे गणित हा विषय  बहुतेकांचा नावडता असतो त्याची अनेक कारणे आहेत या कारणांपैकी एक कारण असेही आहे की गणित विषय आपल्याला शालेय शिक्षणात कशा पद्धतीने शिकवला गेला. जोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांचे बेरीज, वजाबाकी या क्रिया शिकणे चालू असते तोपर्यंत फार प्रश्न येत नाहीत मात्र जेव्हा अपूर्णांक व अपूर्णांकावरील क्रिया शिकायला सुरवात होते तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना गणिताची भिती वाटू लागते. अपूर्णांक शिकवत असताना या कार्यशाळेत शिक्षकाचे अपूर्णांका बाबतचे ज्ञान, अपूर्णांक शिकवण्याची रणनिती ( Strategy ) , मुलांच्या चुका, अपूर्णांकात भाषेचे महत्त्व, पाश्चात्य देशात झालेले संशोधन अशा सर्व बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 
या कार्यशाळेचा थोडक्यात अहवाल खालील प्रमाणे:
लेखवाचन व सादरीकरण : शिक्षकांची अपूर्णांकाबाबतची समज वाढावी यासाठी वेगेवेगेळे लेख वाचण्यात आले त्यात प्रभावी गणित शिक्षणाचे पैलू, अपूर्णांक शिकवण्यापूर्वी, सारखी वाटणी यांचा समावेश होता. हे सर्व लेख टप्प्या टप्प्यात वाचण्यात आले. अपूर्णांकाचे कोणकोणते अर्थ असतात, आपण मुलांना एकच अर्थ सांगितल्याने किती अडचणी निर्माण होतात याचा उहापोह या लेखांत करण्यात आला होता.  प्रत्येक लेखात काय सांगितले आहे याचे सादरीकरण प्रत्येक गटाने केले. उरलेल्या गटांनी त्यात भर घातली. आपल्याला एखादी गोष्ट जरी समजली असली तरी ती दुसर्याला समजून सांगण्यास किती अडचणी येतात याचा अनुभव सर्व शिक्षकांनी घेतला. मुलांनाही बर्‍याच वेळा अशा अडचणी येतात असे सर्व शिक्षकांनी सांगीतले. 
व्हिडिओज पाहणे व सराव करणे : अपूर्णांक शिकवताना कुठून सुरवात करावी, काय रणनिती (Strategy )  आखावी, मुलांना विचार करायला लावतील असे प्रश्न योग्य शब्दात कसे विचारावेत अशा अनेक प्रश्नांची  उत्तरे हे व्हिडिओज पाहून मिळत होती. व्हिडिओ पाहून प्रत्येक व्हिडिओवर चर्चा करण्यात आली. तसेच त्यातील काही पाठांचा Under observation सराव करण्यात आला. बर्याच शिक्षकांना पाठ घेताना सूचना काय द्याव्यात याबाबत अडचणी दिसून आल्या. त्या कशा द्याव्यात याचे सप्रत्यक्षिक मार्गदर्शन वेळच्या वेळी करण्यात आले. संबध कार्यशाळेत अपूर्णांकासंबधी 18 व्हिडिओज पाहण्यात आले. 
या संबंध कार्यशाळेत अपूर्णांकाच्या खालील अर्थांवर भर देण्यात आला होता. 
1. अपूर्णांकांचा पूर्ण-भाग अर्थ (whole-part )
2. अपूर्णांकांचा सारखी वाटणी (भागाकार) हा अर्थ (equal sharing)
3. अपूर्णांकांचा ‘पट’ (संख्येवरील क्रिया) हा अर्थ (operator)
4. अपूर्णांकांचा गुणोत्तर हा अर्थ (ratio)
5. अपूर्णांकांचा माप हा अर्थ (measure)
यासाठी अपूर्णांकावरील व्हिडिओजची मालिका, ठिपका कागद, आणि लेख यांचा आधार घेण्यात आला होता. 
शिक्षकांसाठी : या कार्यशाळेत सहभागींना अपूर्णांकाचे व्हिडिओ असलेली DVD  देण्यात आली. या DVD त  ठिपका कागद व वाचलेल्या लेखांची प्रतही देण्यात आली.