Skip directly to content

Saksham team trains KGBV principals on quality education, Dec. 8-11, 2015

QUEST’s ‘Saksham’ team participated as resource persons in a workshop organized by Maharashtra Prathamik Shikshan Parishad (Mumbai), SCERT (Pune) & UNICEF. Principals and District coordinators of 43 Kasturba Gandhi Balika Vidyalayas attended the workshop. QUEST’s work in the KGBVs in Jalna district was used as a case study to discuss concrete ways for improving the quality of education in these schools. The detailed report (in Marathi) by Project Associate Rajendra More is noted below. 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गुणवत्ता संवर्धन प्रशिक्षण

कालावधी – 8 ते 11 डिसेंबर 2015

ठिकाण – हॉटेल गॅलेक्सी, जालना

सहभागींची संख्या – 86

साधनव्यक्ती – अर्चना कुलकर्णी (क्वेस्ट), राजश्री तिखे, नुतन मघाडे, डॉ. क्षीरसागर, आसिफ शेख, डॉ. मंजुषा क्षीरसागर

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत केजीबीव्हीतील गुणवत्ता संवर्धन कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणात महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील 43 केजीबीव्हींच्या मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुख सहभागी झाले होते. एमपीएसपी (मुंबई), एससीईआरटी (पुणे) व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली होती.

क्वेस्टकडून गत तीन वर्षापासून जालना जिल्ह्यातील सात केजीबीव्हींमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न चालू आहेत. या कामाची सांगड प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाशी कशी घालता येईल हा प्रशिक्षणाचा प्रधान हेतू होता. जालना जिल्ह्यातील कामाला कशी सुरवात झाली? बेसलाईनव्दारे मुलींचे गट कसे केले? शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण करुन झालेली कामे या विषयी अर्चनाताईंनी सविस्तर सत्र घेतले. ऑनसाईट सपोर्ट हा या कार्यक्रमातील अत्यंत म्हत्वाचा घटक कसा आहे यावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम मुलींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कसा प्रभावी ठरला याचा अनुभव जालना जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापिकांनी सांगितला. शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आलेल्या अडचणी व अडचणींवर मात कशी करावी यावर मुख्याध्यापिकांनी सविस्तर माहिती दिली. सुरवातीला आम्हाला हे नकोसं वाटत होतं पण या कार्यक्रमातून मुलींमध्ये प्रगती होताना दिसत होती म्हणून आम्ही कार्यक्रम मागील तीन वर्षापासून शाळांमध्ये राबवत आहोत, आपल्या सर्वच शाळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन व्हायला हवे असे जाहीर आवाहन मुख्याध्यापिकांनी सर्वांना केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करणारच असे सर्वांनी सांगितले.

क्वेस्टकडून जालना जिल्ह्यातील केजीबीव्हींमध्ये ज्या प्रकारे थेट कार्यक्रम राबवला जात आहे, त्याप्रमाणे इतर केजीबीव्हीमध्ये क्वेस्टची थेट मदत नसेल तर मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुखांना क्वेस्टकडून सक्षम कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल. ही सर्व मंडळी आपापल्या शाळांमधील शिक्षकांना ऑनसाईट सपोर्ट देण्याचे काम करतील हे सांगण्यात आले. 

प्रशिक्षणात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या जीआरचे विश्लेषण करण्यात आले. केजीबीव्हीची योजना काय आहे, या विषयी केंद्रप्रमुखांचे प्रबोधन करण्यात आले. प्रगतच्या पायाभूत चाचण्या या विषयी मार्गदर्शन झाले. घेतलेल्या चाचण्यांवरुन डेटा एन्ट्री कशी करावी? डेटाएन्ट्रीचा फॉर्म्याट कसा असेल? मुलांना मिळालेल्या गुणाधारे टक्कवारी काढून गट कसे करावेत या विषयी अर्चनाताईनी सप्रात्यक्षिक सादरीकरण केले. मुख्याध्यापिका, जिल्हा समन्वयक व केंद्रप्रमुखांच्या या कार्यक्रमांतर्गत काय काय जबाबदाऱ्या असतील या विषयी स्पष्ट कल्पना देण्यात आली. कामाला सुरवात केल्यानंतर येणाऱ्या संभाव्य अडचणी कोणत्या, त्या कशा सोडवाव्यात हे जालना जिल्ह्यातील कामाच्या आधारे मांडणी करुन सांगण्यात आले.

एमपीएसपी, मुंबईच्या प्रतिनीधी अर्चना जोशी यांनी जालना व तिर्थपूरी येथील सक्षम कार्यक्रमातील मुलींनी संपादित केलेले सुगंधा व आनंदी मासिक सर्वांना दाखवले. प्रत्येक केजीबीव्हीत वर्षातून किमान तीन वेळा मुलींची मासिकं तयार करून घेण्याचे सांगितले आहे. मासिकामध्ये मुलींचे कशा प्रकारचे लेखन प्रकार असावेत याची स्पष्ट कल्पना दिला. मासिकाच्या निर्मीतीचा खर्च किती व कोणत्या अकाउंट हेडअंतर्गत करावा हे सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेसाठी सुगंधा व आनंदी मासिकाच्या प्रती देण्यात आल्या.

जालना जिल्ह्यातील जालना, मंठा व अंबड येथील केजीबीव्ही भेटीचे आयोजन करण्यात आले होते. क्वेस्टकडून गत तीन वर्षापासून चालू असलेले काम कशा प्रकारचे आहे, गटपध्दतीने वर्गात कसे शिकवावे याचे प्रात्यक्षिक सर्वांना पहायला मिळावे हा शाळा भेटींचा उद्देश होता. ‘माझे पुस्तक’ व इतर साधन साहित्याधारे तिन्ही शाळांमध्ये शिक्षिकांनी वर्ग घेऊन दाखवले.