Skip directly to content

Saksham Orientation Workshop, September 2-3, 2017

'Saksham' is a level-based program developed by QUEST, to empower teachers to help students who are 'falling behind' in their studies. Many students, specially in rural areas, are studying in grade 5 / 6 / 7, but have not mastered the basic concepts of language and math which are covered in primary school. 

The QUEST team organized an orientation workshop about 'Saksham', for a group of interested teachers, on Sept. 2-3, 2017 at Pune. The participants came from various parts of Maharashtra, including Pune, Sangli, Beed, Latur, Usmanabad, Kalyan etc.

Kishor Darak discussed the need of a level-based learning program and how it can help students. Nilesh Nimkar (Director, QUEST) explained the pedagogy of the program and shared the special materials developed by QUEST, namely, 'Saksham Banu Ya' books. Atul Gaikwad explained the mechanics of the program - how a baseline test is conducted with students and how they are divided into groups based on their performance on the test - which helps in designing an appropriate strategy for inputs. Archana Kulkarni shared statistical information about how the 7000 students under the Saksham program have progressed over the years. 

Balasaheb Limbikai, a teacher from Sangli, has been implementing the Saksham program in his school for a year. He shared his observations. Manoti Shinde, a Municipal School teacher from Pune, also shared her observations about how the students' performance on math and language has improved.

All the participants felt that this workshop gave them much energy and food for thought, to do things differently in their schools. Responses by two teachers (in Marathi) are noted below.

राज्यामध्ये सध्या शिक्षकांना भेडसावणारा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, अनेक मुले पाचवी, सहावी, सातवी मध्ये येऊनही त्यांना लिहता-वाचता येत नाही, तसेच त्यांना पायाभूत गणितही येत नाही. अशा मागे पडलेल्या मुलांसाठी क्वेस्टतर्फे 'सक्षम' हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम समजावून देण्यासाठी दिनांक २ व  ३ सप्टेंबर २०१७ रोजी पुणे येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील मधील पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, रायगड, कल्याण, भोर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या २० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यातील बहुतेक जण शिक्षक होते, ज्यांना 'सक्षम' विषयी माहिती करून घ्यायची होती.  

कार्यशाळेत सक्षम कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सक्षम कार्यक्रमाध्ये सुरुवातीला मुलांना एक चाचणी दिली जाते. चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला त्यांच्या गरजप्रमाणे शिकवले जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची सध्याच्या परिस्थितीत नेमकी काय गरज आहे या बाबत श्री किशोर दरक यांनी सविस्तर मांडणी केली. भाषा आणि गणिताचा स्तराधारित अभ्यासक्रम कसा आहे, त्यासाठी क्वेस्टने खास बनवलेली पुस्तके 'सक्षम बनू या' कशी वापरावीत याबाबतचे मार्गदर्शन नीलेश निमकर यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या सुमारे ७००० विद्यार्थ्यांची प्रगती कशी होते आहे या बाबतचे विश्लेषण आकडेवारीच्या मदतीने  क्वेस्टच्या अर्चना कुलकर्णी यांनी सादर केले.  

सांगली येथील भटक्या विमुक्त मुलांच्या आश्रमशाळेत शिकवणारे बाळासाहेब लिंबीकाई हे गेल्या वर्षभरापासून सक्षम हा कार्यक्रम राबवत आहेत, त्यांनी आपले अनुभव एका प्रेजेंटेशन द्वारे मांडले. तसेच पुणे महानगरपालिकेतील शिक्षिका श्रीमती मनोती शिंदे यांनी  हा कार्यक्रम राबवत असताना मुलांमध्ये कसे बदल होत आहेत याबद्दल त्यांची निरीक्षणे मांडली.

कार्यशाळेतील एक सहभागी जे के पाटील यांनी लिहिले आहे: “दोन दिवसात खूप ऊर्जा देणारे सेशन्स तर झालेच; शिवाय *स्तराधारित* शिकणं मुलांच घडत कसं याची सविस्तर माहिती मिळाली.” तसेच संतोष सोनावणे यांनी आपल्या फेसबुक वॉल वर कार्यशाळे बाबत लिहिले आहे: "शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरुप दाखल झालेल्या अशा मुलांची त्या वर्गात बसण्याची मानसिक व बौद्धिक पूर्वतयारी झालेली नसते. त्यातील काही मुलांनी यापूर्वीच शाळा सोडून दिलेली असते तर काही मुले शाळेतच गेलेली नसतात. अशावेळी त्या मुलांच्या सध्याच्या वयातील समजेचा फायदा घेत त्यांची तयारी करवुन घेणे आणि त्यांना मुळ शिक्षण प्रवाहात सामावुन घेण्याचा #सक्षम हा Pedagogyच्या सिध्दांतावर आधारित असा प्रयोग असल्याचे माझ्या निदर्शनास आले. अर्थात केवळ वयानुरुपच नाही तर जी मुले रोज शाळेत येवूनही शिकण्यात अपेक्षित स्तरापर्यंत पोहचत नाहीत अशाही मुलांकरिता हा कार्यक्रम आहे. इथे सारे सांगणे शक्य होत नसले तरी सारांशाने इतके जरुर म्हणता येइल की मुलांच्या संपादणुक जाणून , अडचणी समजून घेउन गरजेनुसार अध्ययन अनुभवांची रचना कारणारा हा एक नियोजनबध्द कार्यक्रम आहे. निलेशदादा, अर्चनाताई आणि सोबत किशोर, अतुल यांसह #QUEST च्या सगळ्या टीमचे मनापासून आभार."

 
 
 
 
 

Tags: