Skip directly to content

Review workshop with Active Library Team - May 6-10, 2017

The team that works on the 'Active Library' program in Wada, Jawhar and Pune, came together to attend a review workshop in Sonale from May 6 to 10, 2017. They revised activities such as 'read aloud', lesson plans based on story books and using picture cards. They even learnt some craft work and poetry reading. Resource person Meena Nimkar and Nilesh Nimkar urged them to check students' writing and give feedback individually. The participants even practiced some songs, and learnt about medicinal plants which can be planted in schools.

क्वेस्ट अंतर्गत पालघर जिल्ह्यातील १० आश्रमशाळा , पुणे शहरातील ५ शाळा तसेच वाडा गावाजवळ उचाट आणि देवगाव येथील शाळेत ग्रंथालय उपक्रम घेतला जातो.  वर्षभरातील कामाचा आढावा तसेच उपक्रमातील  घटकांवर स्पष्टीकरण , नवीन घटकांचे प्रशिक्षण ह्यासाठी दिनांक ६  मे ते १० मे २०१७ दरम्यान  ग्रंथालय प्रशिक्षण कार्यशाळा सोनाळे येथे आयोजित करण्यात आली होती.  ह्या कार्यशाळेला   मार्गदर्शन  मीनाताई निमकर ह्यांनी केले. 

प्रशिक्षणातील सत्रे

1. प्रार्थना, गाणी: शाळांमध्ये परिपाठ घेण्यासाठी उपयुक्त अश्या काही गाण्यांचा अंतर्भाव ह्यात केला गेला. 

2. लेसन प्लान: शाळांमध्ये गोष्टींशी एकरूप होण्यासाठी व त्यातील वाचन आणि आकलन प्रक्रिया  पुढे जाण्याशाठी लेसन प्लान खूपच उपयुक्त ठरतात. त्यासाठी आधीचे काही लेसन प्लान बदलले आणि नव्याने काही तयार केले.

3. प्रकटवाचन: ग्रंथालय उपक्रमामध्ये प्रकट वाचनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गोष्टी सांगताना त्यातील पात्र, घटना सजीव करणे ह्यासाठी प्रभावी वाचन गरजेचे आहे. ह्या घटकावर कार्यशाळेच्या पाचही दिवस काम केले गेले.

4. Craft work: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रक्रियेशी अभिमुख करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. त्यासाठी ह्या कार्यशाळेत क्राफ्ट प्रशिक्षणाचे सत्र ठेवले होते. ह्यामध्ये सर्वांनी ओरिगामी, pop up कागदाच्या वस्तू तयार केल्या.  तसेच  सुकलेल्या पानांपासून पक्ष्यांचे आकारचित्र तयार केले गेले.  

5.औषधी वनस्पतींची लागवड: शाळांमधील वर्गांमध्ये औषधी वनस्पतीन्बद्दल माहितीपत्रक तयार करण्याचे ठरविले गेले. ह्यासाठी पूर्वानियोजनाप्रमाणे बडीशोप , ओवा ह्यांची छोटी रोपे लावण्यात आली. 

6. चित्रकार्ड वापरणे: ग्रंथालय प्रकल्पाच्या प्रशिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना  बोलते करण्यासाठी चित्र कार्डांचा वापर करण्याचे ठरले.  इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गांसाठी क्वेस्टच्या अंकुर प्रकल्पाच्या काही चित्र कार्डांचा वापर करण्याचे योजिले गेले. 

7. कविता वाचन: कवितांचे वाचन आणि अर्थपूर्ण विवेचन केले गेले. कवींची पार्श्वभूमी लक्षात घेवून कवितांची निर्मिती प्रक्रिया असते अश्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.  ह्या सत्रा साठी क्वेस्ट चे संचालक निलेश निमकर ह्यांनी विशेष मार्गदर्शन केले.  

8. देव घेव प्रक्रियेबाबत चर्चा: प्रकल्पांतर्गत उच्च प्राथमिक वर्गांबरोबर पुस्तक देव घेव केली जाते.  ह्या दरम्यान  बऱ्याच शाळांमध्ये मुले पुस्तके हरवतात. त्याची कारणे आणि उपाय ह्यावर चर्चा केली. ह्यासाठी नियमावली तयार केली गेली.  

9.प्रतिक्रियात्मक लेखन: पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकावर प्रतिक्रिया म्हणून मुलांचे लेखन घेतले जाते.  परंतु विद्यार्थी संख्या मोठी असल्याकारणाने आणि वेळेची कमतरता असल्याने ह्या लेखनावर प्रतिक्रिया देणे शक्य होत नाही. लेखनातील गुणात्मक तपासणी करण्याविषयी मार्गदर्शन केले गेले.  कमीत कमी लिखाण घेवून सगळ्यांना प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे आहे ह्यावर मार्गदर्शकांनी भर दिला.

10. गोष्टी तयार करणे: गोष्टींचा आराखडा कसा असतो ह्याविषयी चर्चा करून सर्वांनी  गोष्टी तयार केल्या. 

11. वाचन आणि लेखन प्रकल्प: ग्रंथालयातील उपक्रमातील विद्यार्थ्यांचे वाचन लेखन सघन होण्याआधी ग्रंथालय प्रशिक्षकांचा वाचन लेखनाचा सराव अत्यावश्यक आहे. निलेश सरांनी त्यासाठी नियोजनबद्ध काम करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या.