Skip directly to content

QUEST @ Maharashtra Balshikshan Parishad, Oct. 27-28, 2017

The QUEST team 'rocked' the conference of Maharashtra Balshikshan Parishad! 
The conference was held at Pune on Oct. 27-28. One of the QUESTians, Rupali Patil, presented a research paper on 'Moving from English medium to Marathi medium'. A short film on 'Ankur' was screened, which highlighted the work on Early Childhood Education. Nilesh Nimkar (Director, QUEST) chaired the session on Technology in Education, and opined that technology cannot replace the teacher, it can only help the teacher teach more effectively. The Goshtarang team performed 3 stories and regaled the audience!

क्वेस्ट टीमने गाजवले यावेळचे 'महाराष्ट्र बालशिक्षण परिषद'चे अधिवेशन!
महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे 24 वे अधिवेशन दि.27-28 ऑक्टोबर 2017 ला पुणे (सांगवी) येथे पार पडले. ‘बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान’ हा विषय होता. या परिषदेसाठी महाराष्ट्रातून अनेक संस्थांमधील कार्यकर्ते आले होते. क्वेस्ट मधून रूपाली पाटील यांनी ` इंग्रजी माध्यमाकडून मराठी माध्यमाकडे` हा शोधनिबंध सादर केला.त्याला जोडूनच अंकुर प्रकल्पामध्ये चालणाऱ्या बालशिक्षणाच्या कामाबद्दल छोटी फिल्म दाखवण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्राचे अध्यक्ष नीलेश निमकर होते. त्यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञान हे शिक्षकाला पर्याय नसून त्याचे शिकवणे सुलभ व्हावे यासाठी मदत करणारे आहे हे मांडले. त्यानंतर गोष्टरंगच्या टीम ने तीन गोष्टी उपस्थितांसाठी सादर केल्या, आणि सर्व प्रेक्षकांनी वय विसरून त्या गोष्टींचा आनंद लुटला!