Skip directly to content

'Maase Vaachva Abhiyan' at Tilase - a great success!

Mahashivratri - a big day for QUESTians in Wada Taluka.... because they undertake 'Maase Vaachva Abhiyan' every year, at Tilase, during the Mahashvratri fair, to prevent people from putting garbage in the fish pond which is home to endangered Mahseer fish. During this annual activity held this year on February 24, 2017, the QUESTians were happy to report that there is very little garbage being thrown, probably due to the consistent awareness created by them since 2009!!
महाशिवरात्रीचा दिवस क्वेस्ट टीमसाठी खूप महत्त्वाचा - कारण २००९ पासून दरवर्षी या दिवशी क्वेस्टचे कार्यकर्ते जातात तिळसे (वाडा तालुका) गावच्या जत्रेत "मासे वाचवा अभियान" घेऊन - जत्रेला येणाऱ्या लोकांनी तिथल्या महासीर माशांच्या डोहात कचरा टाकू नये, असं आवाहन करण्यासाठी! या वर्षीच्या जत्रेतही २४ फेब्रुवारीला हाच वार्षिक उपक्रम क्वेस्ट टीमने पुन्हा एकदा राबवला. क्वेस्टच्या सुपरवायझर भावना पाटील यांनी कळवले,  "यावर्षी कचरा खूपच कमी आहे. आणि लोकांनी चांगलं सहकार्य केलं. मला वाटतं मागच्या काही वर्षांच्या कामामुळे हा फरक झालेला आहे!"