Skip directly to content

Akanksha Foundation team visits QUEST

A team of 18 teachers and 3 supervisors from Akanksha Foundation visited QUEST on January 7-8, 2016. Akanksha Foundation runs schools for children from low economic backgroungs, where they teach English, Marathi and Hindi. To teach Marathi, they use 'Maze Pustak'. The QUEST team showed them classroom activities under 3 main programs - Balbhavan (Pali 1 & 2 Ashram Shala), Active Library (Devgaon) and Ankur (Peek and Gargaon Anganwadi). The visitors were quite impressed with the classroom setup and how the QUEST team members were communicating with the students. They expressed a need to get proper training for using Maze Pustak in their schools effectively. 

आकांक्षा  फाउंडेशन ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. त्यांच्या स्वत:च्या शाळा आहेत आणि त्यांचे काम हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधे चालते. मराठी भाषा शिकवण्यसाठी 'माझे पुस्तक'चा वापर केला जातो. क्वेस्ट संस्थेला भेट द्यायला आलेल्या  टीममधे मुंबई आणि पुणे येथे काम करणाऱ्या १८ प्राथमिक शिक्षिका व ३ पर्यवेक्षक होते.  या टीमसाठी  क्वेस्टतर्फे बालभवन (पाली १ व पाली २ आश्रम शाळा), देवगाव येथील ग्रंथालय कार्यक्रम, अंकुर प्रकल्पातील पीक व गारगाव अंगणवाडी ह्या तीन प्रकल्पातील वर्ग आणि सोनाळे येथील रिसोर्स सेन्टर दाखविण्यात आले. तिन्ही प्रकल्पातून त्यांना क्वेस्टचा वर्ग सेटप, मुलांना  लावलेल्या सवयी, वर्गात मुलांशी कसे बोलले जाते, मुलांचा प्रतिसाद कसा मिळविला जातो ह्या गोष्टी खूपच आवडल्या. ते लोक 'माझे पुस्तक' वापरत आहेत, पण त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यांचे काम अधिक परिणामकारक करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज त्यांना ह्या भेटीदरम्यान खूप जाणवली. (रिपोर्ट - तुषार मराडे आणि योगेश राउत)