Skip directly to content

‘मासे वाचवा अभियान’ - March 7, 2016

सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीला, म्हणजे 7 मार्चला, क्वेस्टच्या टीमने केले 'मासे वाचवा अभियान'. तिळसे (वाडा तालुका) इथल्या शिवमंदिरापाशी भरणाऱ्या जत्रेत लोकशिक्षण करण्यासाठी हे अभियान होते. मंदिराजवळ एका डोहात दुर्मिळ प्रजातीचे मासे आहेत, त्या डोहात लोकांनी कचरा टाकू नये म्हणून हा प्रयत्न गेली ७ वर्षं चालू आहे. पहिल्या वर्षी ७-८ पोती कचरा डोहातून काढला होता, पण या वर्षी एकच पोतं भरलं! क्वेस्ट टीमच्या अभियानाचा हा प्रत्यक्ष परिणाम! 

 
 
 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने राबविण्यात आलेले ‘मासे वाचवा अभियान’ खूपच व्यवस्थितपणे पार पडले या अभियानास मदत केलेल्या सर्वच सभासदांचे मनःपूर्वक आभार. या अभियानास आपण सर्वांनी वर्गणी काढून फंड जमा केला. त्यास श्री. अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांच्याकडून मोठी आर्थिक मदत मिळाली. अभियानाची मुख्य जबाबदारी क्वेस्टच्या रिड अलायंस ( READ alliance ) टीमकडे होती. नवीन टीम असूनही कार्यक्रमात कोणतीही कमतरता जाणवली नाही , प्रत्येकाला दिलेल्या जबाबदार्‍या अतिशय चोख पार पाडल्या गेल्या. या वर्षी प्रत्येक स्लॉट मधे कार्यकर्त्याची संख्या जास्त असल्यामुळे कामचा ताण जाणवला नाही. संख्या जास्त असल्यामुळे लोकांवर एक प्रकारचा दबाव निर्माण व्हायचा त्यामुळे खूपच कमी कचरा होत होता. दिवसभरात जो कचरा या कुंडातून जमा करण्यात आला आहे तो वाडा शहरातील कचरा गाडीत जमा केला गेला

 (रिपोर्ट: योगेश राऊत)