Skip directly to content

साक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स

डॉनीला कागदपेन आणि इतर लेखन साहित्य सहज उपलब्ध होतेशिवाय अवतीभवती अनेकजण लिहीत असताना तो पाहात होताया सगळ्यात त्याला रस वाटायला लागला आणि कागद-पेन घेऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला त्याने सुरुवात केली.

त्याने वेगेवेगळे भौमितिक आकार काढले...सुटी सुटी अक्षरे लिहिली...वेगवेगळ्या रंगांत आणि आकारांत आपले नाव लिहिलेइतर मुले आपली स्वतःची पुस्तके बनवतात हे पाहिल्यावर त्यानेही स्वतःचे पुस्तक तयार करायचे ठरवले. ‘लिपी’च्या संकल्पनेचा शिरकाव डॉनीच्या मनात झाला तो अशा रीतीने.

भाषिक दृष्ट्या लिपीचे औचित्य आणि महत्त्व कळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडावी लागतेव्यक्तिगत अर्थ आणि लिपी यांचा संबंध उमगावा लागतोआपले विश्व लिपिबद्ध करता येते हे अनुभवास यावे लागते.लिपी आणि त्याचे स्वतःचे विश्व यांचा संबंध जोडणारा दुवा डॉनीच्या मनात निर्माणच झाला नव्हतायाची मला सगळ्यात जास्त काळजी वाटत होती.

आपले चुकेल अशा भीतीपोटी म्हणा किंवा कुठून सुरुवात करावी हे न कळल्यामुळे म्हणाअक्षरांपलीकडे काहीही लिहायची धडपड करायलाच डॉनी तयार नव्हताम्हणून मगत्याने गोष्टी सांगायच्या आणि त्या मी लिहायच्या असे मी करत गेलेत्यात काही गोष्टी म्हणजे डॉनीच्या अनुभवाच्याच गोष्टी होत्याया गोष्टींचेच वाचन डॉनी आणि मी करत होतोवाचताना ‘शब्द’, ‘वाक्य’ आणि ‘विरामचिन्हे’ यांविषयी मी आवर्जून बोलत होते.

या सगळ्यातून डॉनी आणि लिपी यांच्यात क्षीण असा का होईना पण एक दुवा तयार झालालेखनाच्या तासाला त्याने वहीत काहीतरी लिहिले आणि वही हातात उंचावून तो त्याच्या आईला आणि मला दाखवायला धावत आलात्याचा चेहरा आनंदाने उजळला होता. “मी लिहिलं मी काहीतरी लिहिलंहो ना?” तो उद्गारला आणि त्याच वेळी मनातली आशंकाही त्याने बोलून दाखवलीमी त्याच्या लेखनाकडे पाहिलेत्याने खरोखरच काहीतरी लिहिले होतेत्याने लिहिले होते : I M I. त्याने वाचून दाखवले, “आय् अ‍ॅम आय्.” मी आनंदाने म्हटले, “खरंच तू तूच आहेस आणि तुला लिहिता येतं.”

प्रथमच डॉनीने स्वतःला लिपीतून व्यक्त केले होतेखूप सावधपणे आणि अगदी तात्पुरत्या स्वरूपातचपण त्याने साक्षरतेच्या जगात शिरकाव केला होतामला आशा वाटत होती कीहा शिरकाव तात्कालिक न ठरता,साक्षरतेच्या जगातले त्याचे पहिले पाऊल ठरावे.

पुढचा कितीतरी काळ याचे दृढीकरण करण्यासाठी मी वापरलात्याने सांगायचे आणि मी ते लिहायचेत्याला उत्तम बालसाहित्य वाचून दाखवायचे या गोष्टी चालूच ठेवल्याबोललेला शब्द लिपिबद्ध होतोलिहिलेल्या शब्दांमध्ये मोकळी जागा सोडतातशब्द अक्षरांचे बनतात आणि ती अक्षरे शब्दांत विशिष्ट क्रमाने एकत्र येतातअशी अक्षरे म्हणजे उच्चारांचे दुसरे रूप... असा बाबींविषयी मी त्याच्याशी पुन्हा पुन्हा बोलत राहिले.

जगामध्ये लेखी भाषेच्या द्वारा विविध कामे होत असतातयाविषयीचे डॉनीचे ज्ञान आणि समज वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिलेत्याला मी पत्रे लिहिलीत्याच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या निमित्ताने संदर्भ पुस्तकांमधून माहिती वाचलीवर्तमानपत्रे हाताळलीत्यांतल्या गाड्यांच्या जाहिरातींपासून गल्फ-युद्धाच्या बातम्यांपर्यंत आणि अवकाशयानाविषयीच्या बातम्यांपर्यंत बरेच काही वाचून दाखवले.सार्वजनिक फोनवरची “फोन” ही पाटीस्वच्छतागृहावरची “पुरुष” ही पाटी अशा पाट्याही वाचून दाखवल्या.

नाताळच्या सुट्टीपूर्वीएक महत्त्वाचा चांगला बदल झाल्याचे जेनीने सांगितलेस्पेलिंग टेस्टमध्ये डॉनी तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द अचूक लिहू लागला होताबोलण्यातले आवाज अक्षरांच्या गटाच्या रूपाने लिपिबद्ध होतात हे जसजसे लक्षात येऊ लागलेतसतसे न बदलणार्‍या स्पेलिंग्जवर पकड मिळवण्याच्या दृष्टीने डॉनी थोडा पुढे सरकला.

लेखन शिकण्याच्या वाटचालीतउच्चारानुसारी बोबडे लेखन करण्याचा मुलांना फायदा होतोध्वनी आणि अक्षरे यांच्यातल्या नेमक्या संबंधाची जाणीव होण्यासाठी ते उपकारक ठरतेअनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालेले आहे की कच्च्या मुलांसाठीसुद्धा या कृतीचा खूपच फायदा होतोत्यामुळे डॉनीने बोबडे लेखन करावे असे मला फार वाटे. ‘IMI’चा अपवाद सोडला तर स्वतःची स्पेलिंग्ज करायला तो फारसा राजी नसे.

जेव्हा त्याने तशी सुरुवात केलीतेव्हा त्याने पेन-पेन्सिल किंवा स्केचपेनपेक्षा म्हणजेच अक्षरे लिहिण्यापेक्षा,चिकट अक्षरांचा वापर करणे पसंत केलेजेनी आणि मी बोलत होतो आणि तो आम्हांला काही विचारू शकत नव्हताबहुधात्यामुळे त्याने स्वतःच एक शब्द बनवलाचिकट अक्षरांमधून काळजीपूर्वक अक्षरे निवडून त्याने तयार केलेला शब्द होता – ‘AXRA’. मी त्याला विचारले, “हे काय आहे ?” तेव्हा तो म्हणाला, “एक्स रे”जी बोली भाषा तो बोलत असेत्या भाषेतल्या उच्चारांनुसार तो शब्द त्याने अचूक लिपिबद्ध केला होतात्यात काहीही अधिक-उणे नव्हतेअशा प्रकारे डॉनीचे शब्द बनवणे चालू राहिलेसाधारण महिन्याभरात तो वाक्याच्या पातळीवर पोहोचलाचिकट अक्षरे निवडून त्याने वाक्ये बनवले :

You R mi fran. थँक्यू!” त्याने लिहिलेले वाक्य वाचून मी म्हणाले, “तूही माझा मित्र आहेस...!”

शब्दामधले एखादेच अक्षर बदलून नवीन शब्द तयार करण्याचा खेळ आम्ही खेळलोउदाहरणार्थ, run मधले पहिले अक्षर बदलून bun हा शब्द तयार करायचा किंवा lake मधला काढून घालायचा आणि make शब्द बनवायचाअक्षरांच्या जागा बदलून pit आणि tip असे शब्द करायचे असेही आम्ही खेळलोअक्षरे आणि त्यांचे उच्चार यांच्या परस्परसंबंधाबद्दलची डॉनीची जाण चांगली असल्याचे मला त्यातून पक्के समजले.

माझ्या दृष्टीने डॉनीची वाचनात प्रगती होत होतीमात्र शाळेच्या दृष्टीने तो पूर्णच अपयशी ठरत होताशाळेला त्याची प्रगती का दिसत नव्हती हे समजून घ्यायचे असेलतर शाळेच्या चष्म्यातूनच त्याच्याकडे पाहायला हवेशाळेत वाचन शिकवायला पहिलीत जेव्हा सुरुवात झालीतेव्हा हे गृहीत धरले होते कीडॉनी आणि त्याच्या वर्गातल्या इतर मुलांकडे लिपीविषयीच्या काही संकल्पनांचे ज्ञान आहेमुख्यतः हे गृहीत धरले होते,की जगात नानाविध कामे करण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात लिखित भाषेचा उपयोग केला जातो याची जाणीव मुलांना आहेडावीकडून उजवीकडे लिहिले जाते हे मुलांना माहीत आहेएक ओळ वाचून झाली की नजर त्याखालच्या ओळीवर समासाजवळच्या शब्दापाशी आणायची हे मुलांना माहीत आहेअक्षरशब्दउच्चार या संकल्पनांशी मुले परिचित आहेत...अशा कितीतरी मूलभूत गोष्टी शाळेने गृहीतच धरल्या होत्या आणि त्यावर पहिलीचा अभ्यासक्रम उभारला होताया सगळ्या गोष्टींशी मुले खरेच परिचित आहेत नाहे न जोखताच अभ्यासक्रम आखला गेला होताइंग्रजी भाषेच्या धाटणीनुसार पहिलीच्या शिक्षकानेव्यंजनेत्यांचे शब्दांच्या सुरुवातीचेमधले किंवा शेवटचे स्थानस्वरांची जोडणीत्यांची नावे आणि उच्चारशब्दयमकाचे शब्दनजरेने पाहून लक्षात ठेवण्याचे शब्द...वगैरे सर्व गोष्टी शिकवल्यापुढच्या वर्षाचा म्हणजे दुसरीचा अभ्यासक्रम याहीपुढचा होतामोठे शब्दउपसर्गप्रत्ययवाक्ये असे करत बर्‍यापैकी कठीण असा मजकूर दुसरीच्या अखेरीपर्यंत शिकवला गेलात्यात गद्य उतारेकवितागोष्टीमाहितीपूर्ण मजकूर असे वेगवेगळे पाठ होते.आतापर्यंत आधीच्या सगळ्या कौशल्यांवर मुलांनी प्रभुत्व मिळवले असणार अशा गृहीतकावर हे धडे मुलांनी वाचावेत अशी अपेक्षा होती.

अपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी संदर्भावरून अटकळ बांधणेही मुलांना जमावे अशी त्यात अपेक्षा होतीआधी न पाहिलेला मजकूर वाचून समजून घेण्याची अपेक्षा वर्षअखेरीला केली होतीया वाचनातून त्यांना आनंद मिळेल असेही मानले होतेवर्गातल्या सगळ्या मुलांनी सारख्या वेगानेबरोबरीने पुढे जावे असे मानले होते.त्यामुळे मागे असणार्‍या मुलांसाठी काही करण्यासाठी थांबायला शिक्षकांना उसंत नव्हतीते अभ्यासक्रमाचे टप्पे पूर्ण करण्यासाठीन थांबता नॉनस्टॉप आगगाडीसारखे शिकवत धडाधड पुढे जात होते आणि या सगळ्या प्रकारात डॉनीसारखी काही मुले स्टेशनवरच मागे राहिली होतीआपण नक्की कोठे आहोतकशासाठी हे त्यांना उमगत नव्हते.

डॉनीला तोपर्यंत एवढीच जाणीव झाली होतीकी आपले नाव लिहिता येतेलिहिलेले वाचायचे असतेपुस्तके वाचता येतात...बस् एवढेचडॉनीची समज त्या वेळी एवढीच होतीअभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिलेतर अक्षरांना उच्चार असतातस्पेलिंग करणे आणि वाचणे यांत फरक असतोशब्द वाचायचा असेल तेव्हा अक्षरे एकत्रितपणे वाचायची असतात – यांपैकी कशाचीच जाणीव त्याला नव्हती.

साक्षरता केंद्रात डॉनीची प्रगती होत होतीपण डॉनी इथवर येईपर्यंत वर्गाची गाडी पार दृष्टिपथापलीकडे पोचली होती.

त्याला पुन्हा दुसरीतच शिकायला मिळावे असा मी आग्रह धरलामग सर्वांनी मिळून तसे ठरवलेवाचनाच्या ज्या टप्प्यावर डॉनी पोचला होतातिथून पुढे जाऊन आगगाडी पकडण्याची शक्यता निर्माण झालीअर्थात,त्यासाठी साक्षरता केंद्राची मदत चालूच ठेवली.

डॉनीने वर्गाबरोबर जाऊ शकणे महत्त्वाचे ठरणार होतेकारणनाही तर तो कायमचाच उपायात्मक वर्ग आणि साक्षरता केंद्र एवढ्याच जगात वावरत राहिला असता आणि मग आपल्या आईवडिलांच्याच मार्गावर त्याचीही वाटचाल झाली असती.

डॉनीला शिकवताना आधुनिक विचार आणि संशोधन यांचा आधार मी घेत होतेशिवायत्यापलीकडे जाऊन ‘साक्षर होणे’ ही सांस्कृतिक संदर्भाशी जोडलेली बाब म्हणून मी त्याकडे पाहात होतेशाळेने गृहीत धरलेल्या वाचनपूर्व तयारीने येणार्‍या मुलांहूननिराळ्या सांस्कृतिक वातावरणातून मुले येत असतीलतर निराळ्या दृष्टिकोनातून मुलांना मदत करावी लागतेअशा मुलांचा साक्षरतेच्या विश्वात प्रवेश व्हावा म्हणून वाटाड्याचे काम शिक्षकाने करायला हवेमगच वाचायला शिकणारी मुले साक्षर जगाचे खरेखुरे घटक बनू शकतील.