Skip directly to content

साक्षर होणे आणि डॉनी (भाग १) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स

प्रस्तावना

मूळ लेखामधील नावे आपल्याला वाचताना काहीशी अपरिचित वाटतीलतरीही ती तशीच ठेवली आहेतवाचन-लेखन शिकताना अडचण येणारी मुले जगात सगळीकडे आढळतातज्यांच्या घरची मोठी माणसे साक्षर नाहीत अशी कितीतरी मुले आपल्या देशात आहेतडॉनीच्या घरची मोठी माणेसही साक्षर नव्हतीअशा मुलांकडे बघण्याची आपली दृष्टीत्यांना मदत करण्याचे मार्ग यांबद्दल या लेखातून महत्त्वाचे काही आपल्या हाती लागते.

शालेय व्यवस्थेची चौकट अशा मुलांच्या संदर्भात कशी अपुरी पडते याचे या लेखात आलेले उल्लेख बोधक आहेतलिहिता-वाचता न येणार्‍या मुलांना स्वतःबद्दल काय वाटतेत्यांची आत्मप्रतिमा कशी घडत जाते यांचेही संदर्भ या लेखात येतात.

लिखित शब्दअक्षरेउच्चारवाचन शिकण्याची प्रक्रिया यांविषयीचे लेखात टिपलेले बारकावे समजून घेण्यासारखे आहेतवाचनाची अडचण असणार्‍या मुलांकडे बघण्याची आपली दृष्टी त्यातून आमूलाग्र बदलून जाईल.

 डॉनीच्या घरचे वातावरण साक्षरतेला पूरक असे नाहीजेनी ही त्याची आईशाळेत जाऊनही वाचायला शिकू शकली नाही.

जेनी आता प्रौढांच्या वर्गाला जात होतीपारंपरिक पद्धतीनेकौशल्याधारित असे वाचन-लेखन शिकण्यात डॉनी आणि जेनी दोघांनाही यश आले नव्हतेजेनीच्या लहानपणी शाळेत काय घडले याची माहिती मला अभ्यासासाठी उपलब्ध झाली नाहीत्या बाबतीत तिच्या तेव्हाच्या आठवणी तेवढ्या मला नोंदता आल्यातिची सर्वांत तीव्र आठवण ही निराशा होण्याचीवेगळे पडलो आहोत असे वाटण्याची होतीजेनीने सांगितले, “माझ्या बहुतेकशा मित्रमैत्रिणींना वाचता यायचेमला नाही यायचेत्यामुळे मी त्यांच्या वहीतले बघून उतरवायचेवर्गात एकदा ऐकले की त्यांना समजायचेमला समजायचे नाहीम्हणून मी खूपदा हात वर करायचे ‘हात खाली कर ग !’ मला शिक्षक सांगायचेत्यांना माझे काही ऐकूनच घ्यायचे नसायचेमग मलाही विचारायची लाज वाटायचीमुले मला हसायची आणि मग मी होते तिथेच राहायचेपुढे पुढे माझे हात वर करणेही बंद पडले.”

डॉनी आणि जेनी यांच्याशी माझी गाठ पडली तेव्हा दोघेही शाळेत होतेतिथेच मला त्यांचे निरीक्षण करता आलेत्यांचे स्वाध्यायपरीक्षा यांविषयीही समजून घेता आले.

स्वयंसेवकांनी चालवलेल्या एका प्रौढ साक्षरता शाळेत जेनी शिकत होतीतिथले तिचे तिसरे वर्ष होते.वाचायला शिकणे हे तिचे सर्वांत पहिले उद्दिष्ट होतेसोडवलेले व्यवसाय आणि स्वाध्याय तिने मला दाखवले.

ती वाचण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी मी अपार उत्सुक होतेप्रत्येक पानावर दोन-तीन परिच्छेद आणि त्यांखाली प्रश्न होतेपरिच्छेदांचे विषय प्रौढांच्या जगाशी संबंधित होतेबाजारहाटकाम वगैरे.

साधारणपणे चौथीच्या टप्प्यावरचा उतारा तिने वाचण्यासाठी निवडलाथांबत-थांबत ती एकेक शब्द वाचत गेलीकाही शब्दांच्या जागी तिने थोडासाच फरक असलेला दुसरा शब्द वाचलाउदाहरणार्थ, with या शब्दाऐवजीwhich वाचलेकाही शब्दांमधल्या एखाद्या अक्षराच्या जागी तिने दुसरेच अक्षर वाचलेआणि वाचल्यावर आपापले दुरुस्त केले नाही किंवा स्वतःशी पुन्हा वाचूनही पाहिले नाही.

ती कसे वाचते हे पाहून माझ्या लक्षात आले की वाचणे म्हणजे तिच्या दृष्टीने जणू ‘सुटे सुटे शब्द लक्षात ठेवणे’ होतेवाक्याची रचनाअर्थ यांच्यापर्यंत ती पोहोचतच नव्हती.

हे शब्द इथे स्वाध्यायपुस्तकात मला वाचता येतातपण इतर कुठे दिसलेतर नाही वाचता येत.” ती म्हणाली.

वाचनाशी संबंधित असलेली घटक-कौशल्ये एक एक करत स्वतंत्रपणे शिकून घेऊन त्यांच्यावर प्रभुत्व मिळवले की वाचता येते असा दृष्टिकोन पारंपरिक शिक्षणपद्धतीत दिसतोत्यानुसार साचेबंद पद्धतीने आधी सोपी आणि पुढे क्रमाक्रमाने अवघड कौशल्ये शिकत जायची असताततर वाचन शिकवण्याच्या कौशल्याधारित पद्धतीत खास बनवलेल्या साहित्याचा वापर केला जातोवाचनाच्या विशिष्ट घटककौशल्यासाठी विशिष्ट उतारे असतातत्या कौशल्यांचे दोन मुख्य प्रकार असतात – अक्षरओळखीशी संबंधित कौशल्ये आणि आकलनाशी जोडलेली कौशल्येयाही पद्धतीत असे मानले जाते कीमूल आधी वाचायला शिकते आणि मग शिकण्यासाठी वाचते.

डॉन आणि जेनीला शिकवायला या दोन्हींहून निराळ्यानव्याच पद्धतींची आवश्यकता होती हे उघड होते.कारण उण्यापुर्‍या दहा वर्षांत जेनीला आणि वर्षभरात डॉनीला या कौशल्याधारित अभ्यासक्रमातही पुरेशी प्रगती करता आली नव्हती.

दोघेही खर्‍या अर्थाने साक्षर व्हावेत यासाठी मार्ग शोधणे ही मला शिक्षक म्हणून माझी जबाबदारी वाटली आणि मी शोध घ्यायचा ठरवला.

लिखित भाषा’, ‘लिपी’ किंवा ‘भाषेचे लेखी रूप’ असे काही असते ही संकल्पना डॉनीला समजेपर्यंतत्याला वाचन शिकवण्याच्या सर्व पद्धती निरर्थक ठरल्यालिहिलेल्या भाषेचा व्यवहारात कुठे कुठे कसा कसा उपयोग होतोयाचा समृद्ध अनुभव त्याला मिळणे गरजेचे होतेकारण त्याचे घर ‘साक्षर’ नव्हतेजीवनातल्या अनेक खर्‍याखुर्‍या प्रसंगांमध्ये लिपीचा वापर करण्यात सहभागी होणे, ‘लिहिले जाते’ याचे निरीक्षण करणे या अनुभवातून त्याने जाणे महत्त्वाचे होतेलिपी हे भाषेचे एक रूप आहे हे उमजल्यावरच वाचनाची विविध कौशल्ये आत्मसात करणे त्याला सोपे जाणार होतेत्यासाठी ‘लिखित भाषा’ हा आपल्या जीवनाचा मोठा भाग असतो हे त्याला समजायला हवे होते.

या संकल्पना समजायला डॉनीला मदत होईल असे साक्षरता केंद्रातील वर्गातले वातावरण होतेसोपी-अवघड,लहान-मोठी अशी विविध प्रकारची पुस्तके त्या प्रशस्त खोलीत होतीमासिकेवर्तमानपत्रेही होतीतर्‍हेतर्‍हेच्या चिठ्ठ्यासूचनाकोडीभित्तिपत्रकेकार्यक्रमांविषयीची माहिती यांनी भिंती भरलेल्या होत्याकेंद्रातल्या विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकेही वाचण्यासाठी उपलब्ध होतीस्वतः ठरवून आपल्याला हव्या त्या कारणासाठी वाचायला आणि लिहायला मुलांना प्रोत्साहन दिले जात होतेमुलांनी लिहावे यासाठी नाना प्रकारचे साहित्य मुलांना सहज मिळत होतेफळेखडेतेली खडूकागदचिकटवण्याची अक्षरेवह्यापाकिटे,डायर्‍यालहानमोठी पॅड्सनिरोपाच्या चिठ्ठ्या लिहिण्यासाठी कागदडिंकचिकटपट्ट्या...एक ना दोन विविध प्रकारची गाणीगोष्टीपुस्तके टेपरेकॉर्डरवर ऐकण्याचीही सोय होती...

खोलीचा आकार ‘अनियमित’ प्रकारातला होताएकेकट्याने किंवा दोस्तांबरोबर बसायला छोट्या जागाकोपरे,खोबणी आवर्जून निर्माण केलेल्या होत्यातिथे बसून लिहायला-वाचायला मुलांना आवडे.

कौशल्यांवर आधारित वाचन शिकवण्याच्या पद्धतींपेक्षा साक्षरता केंद्रावरची शिकवण्याची पद्धत अनेक कारणांसाठी वेगळी होतीया पद्धतीला मानसशास्त्र आणि भाषाशास्त्र यांची बैठक होतीत्या बैठकीला ज्या तत्त्वांचा आधार होताती पुढे दिली आहेत :

  1. व्यवहारातील वापरापासून तोडूननिराळी करून भाषा शिकता येत नाहीतर तिच्या अर्थपूर्ण वापराशी जोडूनच ती शिकता येते.

  2. वापरता वापरता भाषिक कौशल्ये आत्मसात करता येतातवापरापासून वेगळी काढून नव्हे.

  3. भाषाविकास हा विस्तारणार्‍या विविध संदर्भांमध्ये घडत जातो.

वाचन शिकवणे आणि लेखन शिकवणे या परस्परपूरक अशा गोष्टी आहेतया भाषिक प्रक्रियांची एकमेकींना मदत होत असतेआपण लिहितोते कोणासाठी तरी लिहितो आणि वाचतोते कोणीतरी लिहिलेले वाचतो.लिहायला शिकताना आत्मसात केलेल्या गोष्टी आपल्याला वाचताना उपयोगी पडताततसेच वाचायला शिकताना आत्मसात केलेल्या गोष्टी लिहिताना उपयोगी पडतात.

केंद्रावर असताना डॉनीच्या आसपास काही ना काही लिहीत असणारीवाचत असणारी मुले-माणसे असततोही त्यांच्याबरोबर या कृतींमध्ये ओढला जाईवर्गातल्या बाकावर एकाच एका जागी बसून राहण्यापेक्षा हे वेगळे होते.

वाचन आणि लेखनाची डॉनीची तयारी करून घेण्यासाठी हाताशी वेळ थोडा होतात्या तयारीचा भाग म्हणून मी त्याला दोन प्रकारच्या पुस्तकांमधून वाचून दाखवत होतेवाचनाच्या त्याच्या आवाक्यातली पुस्तके आणि त्याच्या आवाक्याच्या पलीकडची पुस्तके वाचून दाखवलेली ऐकायला त्याला आवडायचेगोष्ट पुढे कशी सरकतेते तो मनापासून ऐकायचात्याकडे त्याचे लक्ष असायचेगोष्टीतल्या व्यक्तिरेखांबद्दल अधूनमधून तो बोलायचाहीशिवाय पुढे काय होईल याची अटकळही बांधायचा.

शब्द लिपीत बांधलेले असतात हे त्याला दाखवण्यासाठी मी एक कृती करायची ठरवलीएक पुस्तक त्याला वाचून दाखवलेतेच परत परत वाचून दाखवलेपुस्तकाची झेरॉक्स प्रत काढलीत्यातल्या वाक्यांच्या पट्ट्या त्याला कापून दिल्यात्यावरच्या लिपीकडे म्हणजेच शब्दांकडे एकाग्रतेने पाहणे ही गोष्ट डॉनी पहिल्यांदाच करत होताआणि ते त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हतेवाक्यपट्ट्या जुळवायला त्याला मजा येत होतीपण त्याची दमछाकही होत होतीम्हणून दर वेळी थोडा वेळच आम्ही क्रम जुळवत होतोहे करताना वाक्यशब्द आणि अक्षर यांच्याबद्दल मी मुद्दाम बोलत होते.

डॉनीच्या संकल्पनेतले ‘लिहिणे’ म्हणजे ‘उतरवून काढणे’आपल्या मनातले लिहिण्याआधी त्याने कितीतरी पुस्तकांमधून शब्द उतरवून काढले.

त्याला कागद आणि इतर लेखन साहित्य सहज उपलब्ध होतेशिवाय अवतीभोवती अनेक जण लिहीत असताना तो पाहात होताया सगळ्यात त्याला रस वाटायला लागला आणि कागद-पेन घेऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला त्याने सुरुवात केली.