Skip directly to content

मंटूची होडी

मंटू बेडकी तलावात राहते. तलावात मासे आहेत. ते पकडायला माणसे होडी घेऊन येतात. मंटूलाही होडीत बसायचे आहे. पण माणसांजवळ जायला ती घाबरते. आज तिने ठरवले की काहीही झाले तरी होडीत बसायचेच. आपण आपलीच होडी बनवू या. तिने नारळाची करवंटी आणली. करवंटीला पानाचे शीड जोडले आणि तिची होडी तलावात ढकलली. होडीत बसून हलत डुलत मंटू तलावात फिरू लागली. तोच जोराचा वारा सुटला. होडी उलटली आणि मंटू तलावात पडली. जोरात पाय हलवत तिने बुडी मारली. मंटूला होडीची सफर खूप आवडली.
 
१. मंटू बेडकी कुठे राहते ?
२. तिला होडीत का जाता येत नव्हते ? 
३. तिने होडी कशी बनवली ?
४. होडी उलटल्यावर मंटू घाबरली असेल का ?