Skip directly to content

बाजार

काल सोमवार होता. आनगावला आठवडी बाजार होता. कृपा आईबरोबर बाजारात गेली. आईने बाजारात विकायला टोपलीभरून भाजी बरोबर घेतली.टोपलीत वांगी होती, भेंडी होती आणि थोडी काकडीपण होती. आई पुलापाशी झाडाखाली भाजी विकायला बसली. थोडे पैसे घेऊन कृपा बाजारात गेली. तिने दुकानातून लाल रीबीन घेतली. पाढे लिहायला चौकटीची वही घेतली. पेनाची रिफिल घेतली. मग ती आईबरोबर भाजी विकायला बसली. बाजारातून निघताना आईने कांदे, हळद, मसाला आणि बाबासाठी औषधं घेतली. कृपा आईबरोबर जीपगाडीतून घरी आली.
 
१. आईने बाजारात विकायला काय काय घेतले ?
२. कृपाने बाजारात काय काय घेतले ?
३. आनगावचा बाजार नदीकाठी भरत असेल का ? कशावरून ?
४. कृपाच्या घरी कोणी आजारी आहे का ? कशावरून ?