Skip directly to content

तुमच्या संगणकावर मराठी कसे चालू कराल?

विंडोजच्या एक्स पी आवृत्तीपासूनच्या नंतरच्या सर्व आवृत्त्यांमधे म्हणजे व्हिस्टा, विंडोज ७ किंवा लिनक्समधे मराठी वापरण्याची सोय असतेच. फक्त ती सोय चालू करावी लागते. 

कॉमप्युटरवर मराठी कसे चालू करायचे याची सविस्तर महिती देणारी पुस्तिका आमचे हितचिंतक  श्री. राममोहन खानापूरकर यांनी तयार केली आहे व ती येथे उतरवून घेण्यासाठी विनामूल्य ठेवली आहे. या पुस्तिकेच्या प्रती काढून किंवा छापून वाटावयासही हरकत नाही. 

पुस्तिका येथून उतरवून घ्या 

 

विंडोज ७ वर मराठी कसे चालू करायचे याचा व्हिडिओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुमच्याकडे विंडोज एक्स पी असल्यास त्याच्यावर यूनिकोड चालू करण्यासाठी विंडोज एक्स पीची सीडी लागते. ती नसल्यास युनिकोड चालू करण्यासाठी आयकॉम्पलेक्स हे छोटेसे सॉफ्टवेअर वापरा. ते उतरवून घेण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा. हे सॉफ्टवेअर व्हिस्टा आर्क या कंपनीने उपलबद्ध करुव दिले आहे. 

मराठीतून काम करण्यासाठी मराठीतून बऱ्यापैकी वेगाने टाईप करण्यासाठी भारत सरकारमान्य इनस्क्रिप्ट टायपिंग पद्धतीचा सराव असणे आवश्यक आहे. इनस्क्रिप्ट टायपिंग शिकण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा. या शिकवणी द्वारे तुम्ही तुमच्या संस्थेत, शाळेत, कॉलेजमधे, ऑफिसमधे माफक फी देऊन मोठ्या प्रमाणात वर्गही चालवू शकता. अधिक माहितीसाठी nvncom(a)yahoo.com येथे संर्पक साधा.

 

एकदा मराठी युनिकोड चालू केलेत की मराठी आपण संगणकावर सहज वापरू शकता. मराठीसाठी विंडोजवरती मंगल हा फॉंट येतो. बरेच जणांना या फॉंटची वळणे मराठीसाठी सुयोग्य वाटत नाही. मराठीत काम करतांना मराठीसाठी अत्यंत सुयोग्य असा फॉंट संस्कृत २००३ ओंकाराश्रम मसुरी यांनी तयार केला आहे. हा टंक उतरवून घेण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा आणि त्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

एकदा तुम्ही युनिकोड मराठीत काम केलेत की मग मंगल किंवा संस्कृत २००३ किंवा इतर कोणत्याही युनिकोड फॉंटची वळणे वापरण्यासाठी परत परत टायपिंगचे काम करावे लागत नाही. फक्त फॉंट युनिकोड मानक प्रमाणानुसार असावा लागतो.