Skip directly to content

ज्यां पियाजे यांच्या सिद्धांतांविषयी व त्यांच्या उपयोजनाविषयी - डोरोथी सिंगर

प्रस्तावना

ज्यां पियाजे हे मागच्या शतकातले महत्त्वाचे शिक्षणतज्ज्ञमानसतज्ज्ञत्यांनी चाळीसेक पुस्तके लिहिली आणि शेकडो लेख लिहिलेभोवतालच्या जगाचा अर्थ लावायला मूल कसे शिकते हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषयमुलाची भाषाखेळतर्ककाळाची संकल्पनाअवकाशाची संकल्पना आणि संख्या संकल्पना यांचा विकास कसा होत जातो यावर पियाजेंनी संशोधन केलेत्यांच्या लेखनाची भाषा गुंतागुंतीची आणि क्लिष्ट आहेसिंगर आणि रेव्हनसन यांनी पियाजेंचे मूळ विचार सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

१९८० मध्ये पियाजे यांचे निधन झालेतेव्हा ते ८४ वर्षांचे होतेउणीपुरी सहा दशके त्यांनी संशोधन केले.विशेष म्हणजे १९२०च्या सुमारास त्यांनी केलेल्या संशोधनावर खूप चर्चा झाल्याते सहज स्वीकारले गेले नाहीत्याला विरोध झालापरंतु त्यांचे सिद्धांत इतके महत्त्वाचे होतेकी तेव्हाच्या त्यांच्या सिद्धांतांवर अजूनही संशोधन सुरू आहे.

बालविकासावरच्या सर्व कोर्सेसमध्ये पियाजे यांच्या सिद्धांतांचा अंतर्भाव असतोचमुलांबरोबर काम करणार्‍या प्रत्येकाने ते समजून घ्यायला हवेतआजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातल्या मुलांना पियाजे यांचे सिद्धांत लागू होतात काकी मुलांमध्ये काही बदल झालेले दिसतात याचा विचार करणे हेही एक आव्हानच आहे.

पियाजेंच्या संशोधनाचा शिकण्या-शिकवण्यासाठी वापर

वर्गातील अध्यापन बदलावेत्यात सुधारणा व्हावी म्हणून थेट प्रयत्न काही पियाजेंनी केले नाहीतमात्र त्यांच्या मूलभूत अशा विपुल लेखनामुळे जगभरातले शिक्षणतज्ज्ञ प्रभावित झाले...! समकालीन शिक्षणपद्धतींविषयी पियाजेंचे काही आक्षेप होते. ‘शिक्षणशास्त्र आणि मुलांचे मानसशास्त्र’ यात ते म्हणतात,शिक्षणात गाभ्याचे असे तीन प्रश्न आहेत :

  • मुलांना शिकवण्याची उद्दिष्टे काय आहेत ?

  • शिकवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जाव्यात ?

  • कोणते विषय शिकवले जावेत ?

हे प्रश्न निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या अडसरांची एक यादीच ते देतातशिक्षण देणेशिकवणे हे एक शास्त्र आहेआणि बाकीच्या शास्त्रांची त्याला फारशी मदत झालेली नाहीदुसरे म्हणजेसंशोधक किंवा वैज्ञानिक विद्यापीठाशी जवळून जोडलेले असतातपरंतु शिक्षक शासकीय योजनांनी जखडलेले असतातशिक्षणशास्त्राच्या उपयोजनात कार्यक्षमता वाढणार्‍या जोशाचा अभाव दिसतो.

शिक्षक-प्रशिक्षणाच्या सुमार दर्जावरही पियाजेंनी टीका केलीविद्यापीठे आणि शाळा यांमध्ये पक्के दुवे निर्माण व्हायला हवेतअसे त्यांनी मांडलेशिक्षक-प्रशिक्षणाच्या प्रारूपाविषयीअभ्यासक्रमाविषयी अधिक संशोधन होण्याची गरज त्यांनी आग्रहपूर्वक मांडली.

पूर्वप्राथमिक शिक्षणाबाबत त्यांची भूमिक टोकाची आग्रहाची होतीअनेक गोष्टी मुक्तपणे हाताळण्याची संधी या वयात मुलांना मिळायला हवीत्यातूनच त्यांचा संवेदन-कारक विकास व्हायला मदत होतेया भूमिकेचा त्यांनी कायम पुरस्कार केला.

सत्तर वर्षांपूर्वीचम्हणजेच १९३९ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत असे मांडले कीवाचनलेखन,अंकगणित शिकवण्याची सुरुवात प्राथमिक शाळेत व्हावीप्राथमिक शाळेतील शिक्षण सुरू होण्याआधी मुलांच्या संवेदनांचा आणि कारक विकास होण्याआधी योग्य असे वातावरण आणि सुविधा मिळायला हव्यातयाबाबतचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी मुलांबरोबर काम केलेतर पुढे अनेक संकल्पना आपआपल्या समजून घ्यायला आणि भाषाविकासाला मुलांना मदत होते.

पूर्व-प्राथमिक टप्प्यावरील काळ मुलांच्या बौद्धिकसामाजिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असतोयावर बहुतेक शिक्षणतज्ज्ञांचे एकमत आहेपहिल्या तीन वर्षांतमहत्त्वाच्या अशा बर्‍याच गोष्टी मुले शिकतात.

पियाजे यांनी अखेरीस लिहिलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे “द ग्रास्प ऑफ कॉन्शसनेस” (-जाणिवेवरची पकड). या पुस्तकाचा विषय म्हणजे वेगवेगळ्या क्रिया कशा केल्या जातात याबाबतची मुलांची समज.उदारहणार्थफळकुटावरचे खोके फळकुटासकट दोरीने ओढणेखेळण्यातल्या गाडीसाठी उतार तयार करणेहात-पाय टेकवून चालणेइत्यादीया क्रिया कशा केल्या जातात असे मुलांना वाटते हे पियाजेंनी समजून घेतले.त्यासाठी त्यांनी मुलांना प्रश्न विचारून त्यांच्या मुलाखती घेतल्यापियाजेंचे निरीक्षण असे होते कीएखादी क्रिया यशस्वीपणे करायला मुलांना जमले तरी त्याविषयीचे त्यांनी दिलेले स्पष्टीरकरण अचूक नसतेचार वर्षे वयापासून ते कुमारवयापर्यंतची मुले या क्रियांची वेगवेगळी स्पष्टीकरणे देतातसाधारणपणे अकराव्या-बाराव्या वर्षापर्यंत मुलांच्या जाणिवेचा विकास सर्वाधिक झालेला आढळतोया वयाची मुले प्रयोगातल्या घटकांची पडताळणी करू शकताततसेच सिद्धांताच्या स्वरूपात त्यांची मांडणी करू शकतातकाही गोष्टी कशा घडतात हे नेमके समजण्यासाठी मुलाला वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वस्तूसाहित्य हाताळायला मिळणे फार महत्त्वाचे असतेअशा हाताळणीतूनच समज आकारायला लागते.

मूल दोन मार्गांनी शिकतेअनुभवाधिष्ठित किंवा प्रत्यक्ष ज्ञान मिळवणेतर्काधिष्ठित ज्ञान मिळवणेमणी,मातीठोकळे अशा साहित्याशी मूल खेळत असेलतर आकारलहानमोठेपणालांबीउंची असे भौतिक गुणधर्म समजून घेण्यासाठी ते ज्ञानेंद्रिये वापरत असते.

मोठ्या ठोकळ्यांवर छोटे ठोकळे ठेवत गेले की मनोरा बनतोमोठे ठोकळे छोट्यांना आधार देतात हे किल्ला रचता रचता मूल शिकत असतेमाती थापली की भाकरीसारखी होते आणि तिला अलगद लांबट वळवले की सापासारखी होतेहेही मूल शिकतेमाती चिकट असतेयोग्य तेवढा दाब देऊन वळवता-वाकवता येते हेही मूल शिकतेसक्रिय सहभागातून आणि ज्ञानेंद्रियांच्या द्वारा मूल वेगवेगळ्या वस्तूंविषयीसाहित्याविषयी ज्ञान मिळवत असते.

तर्क करूनही मूल ज्ञान मिळवत असतेआकारमापेरंग यांच्यावर आधारित असे वस्तूवस्तूंमधले संबंध,संख्याज्ञानकमी-जास्त-सारखेपणाकाळ आणि अवकाश या संकल्पनांचा विकास तर्क वापरल्याने होत असतो.मूल ठोकळ्यांशी खेळतेतेव्हा हे शिकतेकी ठोकळे लाकडीकागदी किंवा प्लॅस्टिकचे असू शकतातत्यांचे विशिष्ट गुणधर्म असतातठोकळ्यांबाबतच्या या समजेविषयीची एक चौकट त्याच्या मनात आकारतेठोकळे आकाराप्रमाणे लावता येतातओळीने लावता येतातआपल्याकडे कमी ठोकळे आहेत किंवा खूप ठोकळे आहेत,हेही मूल शिकतेतीन लहान ठोकळे एका मोठ्या ठोकळ्यावर बरोबर बसतात हेही मुलाला शिकायला मिळते.अशा रीतीने मापन आणि मोजणी यांची संकल्पना शिकण्यासाठी मुलाला संधी मिळत जातात.

खेळता खेळता मुले वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करतातवेगवेगळ्या आकारांचे लहान-मोठे....पण लाल रंगाचे सगळे ठोकळे मुले एकत्र करताततर कधी वेगवेगळ्या रंगाचे पण गोलाकार ठोकळे एकत्र करतातया संदर्भात एक मुद्दा महत्त्वाचाखेळणी मुलाच्या वयाला साजेशी असायला हवीत.

पियाजे म्हणतातनवीन संकल्पनेची ‘चौकट’ बनवण्याची क्षमता मूल जेव्हा जीवशास्त्रीय दृष्ट्या प्राप्त करते,तेव्हाच मूल नवे काहीतरी शिकते. ‘पिवळ्या-पिवळ्या गाड्या’ एकत्र करण्याची ज्या मुलाची पूर्वतयारीच झालेली नाहीते मूल गाड्यांशी फक्त ‘गाडी गाडी’ एवढेच खेळतेकोणत्याही गाड्यांचे कसेही गट करतेमात्र वर्गीकरणाची ‘तयारी झालेले’ मूल रंगआकारप्रकार अशा वेगवेगळ्या निकषांवर वर्गीकरण करते.

पियाजेंच्या सिद्धांताशी परिचित असलेला शिक्षक मुलांना नाना प्रकारचे साहित्य पुरवतो आणि मुलांनी ते मुक्तपणे हाताळावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो.

नियोजनबद्ध शिक्षण आणि मुक्तपणे खेळता खेळता होणारे सहज शिक्षण यांची योग्य प्रकारे सांगड घातली जायला हवीवास्तवात मुलांना शाळेपलीकडे जाऊन अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागतेअशा प्रसंगी,कृतिशीलतेतून घेतलेले धडे मुलांच्या उपयोगी पडतात.

पूर्वप्राथमिक टप्प्यावर आणि प्राथमिक शिक्षणाच्या आरंभीपियाजेंच्या कल्पनांवर आणि विचारांवर आधारित अशा कोणत्या कृती मुलांना देता येतील हे पाहू :

वर्गीकरण : बटणेप्लॅस्टिकची झाकणेदोर्‍याची रिळेलोकरीचे तुकडे असे साहित्य मुलांना वर्गीकरणासाठी द्यावेरंगआकारलहान-मोठेपणा यांपैकी कशाहीनुसार मुले त्यांचे वर्गीकरण करतीलपहिली पायरी असेल कोणत्याही एकाच निकषानुसार ‘साधे वर्गीकरण’ करण्याचीनंतरच्या पायरीवर मुले दोन निकषांनुसार वर्गीकरण करतीलउदारणार्थगोल आणि लाल असलेल्या वस्तूनिळ्या आणि चौकोनी वस्तूयानंतरच्या टप्प्यांवर मुले शिकतीलकी पिवळ्या वस्तूंमधे काही गोल आहेतकाही चौकोनी आणि काही त्रिकोनीहळूहळू खेळताखेळता मुलांना हे उमजेलकी वस्तूंचे उपगट होऊ शकतात. ‘पिवळे मणी’ आणि ‘लाल मणी’ हे ‘मणी’ या मोठ्या गटाचे भाग आहेत.

या सगळ्या संकल्पनांचे भाषेच्या द्वारा स्पष्टीकरण देता येण्याआधी निरीक्षणस्पर्शअनुभूती यांतून वस्तूंची वैशिष्ट्ये समजून घेणे फार महत्त्वाचे असते.

संख्याअवकाश आणि काळ : मुले क्रमाने संख्या म्हणायला शिकतातती पोपटपंचीच मूर्त वस्तू हाताळणे,मांडणे यांचा अनुभव दिल्याखेरीज ‘कमी’, ‘जास्त’, ‘समान’, ‘वेगळे’ या संकल्पना मुलांना समजत नाहीत.

तेवढ्याच वस्तूघेऊन त्यांचे वेगवेगळे दोन दोन गट करणे (उदाहरणार्थ१० वस्तूंचे ५++++७ वगैरे), लांबट किंवा चौकोनी सतरंजीवर तेवढ्याच मुलांना बसवणे अशा कृतींमधून मुले संख्याअवकाश यांच्या टिकाऊपणाविषयी शिकतातकसेही गट केले तरी एकूण बिया १०च राहिल्यालांबट किंवा चौकोनी सतरंजी घेतली तरी मुलांना जागा तेवढीच लागलीछोट्या कपातले पाणी मोठ्या कपात ओतले तरी पाणी तेवढेच राहिले... हे मुलांनी अनुभवणे महत्त्वाचे.

वर-खालीउजवे-डावेमागे-पुढे या संकल्पना संदर्भानुसार बदलतातछोटे घरशेतझाडखोके अशा प्रतिकृती वा वस्तू वापरून आणि खेळण्यातल्या व्यक्तिरेखा वापरूनविविध खेळ घेऊनया संकल्पनांचा विकास होण्यासाछी मुलांना मदत करता येते.

आपल्याखेरीज दुसर्‍या कोणाच्यासमोरच्याच्या दृष्टिकोनातून बघणे मुलांना लहान वयात जमत नाहीती स्वतः प्रत्यक्ष उठून दुसर्‍याच्या जागी जाताततेव्हाच त्यांना दुसर्‍याचा दृष्टिकोन समजतोयाला पियाजे ‘अवकाशीय संदर्भातली स्वकेंद्रितता’ म्हणतात.

जोडणी करण्याची खेळणी मुलांना मिळणे महत्त्वाचे असते. ‘पूर्ण’ आणि त्याचे ‘भाग’ ही संकल्पना विकसित होण्यासाठी त्यांची मदत होते.

प्रतलक्षितिजसमांतरओळंबा या संकल्पना मुलाच्या दृष्टीने कठीण असतातविशिष्ट वयापर्यंतच्या मुलांनी चित्रात काढलेले डोंगरावरचे घर डोंगरउताराला काटकोनात असतेडोंगरउतारावरची माणसेही उताराला ९०च्या कोनात उभी असतातसातव्या वर्षानंतर यात बदल होताना दिसतो.

अवकाशाविषयीची मुलाची संकल्पना आकारण्याला अनुकरणाच्या खेळातूनही मदत होतेशारीरिक हालचाली,त्यांचा वेगउपलब्ध जागा.... या सगळ्यातून अवकाशाची संकल्पना विकसित होत जाते.

बी पेरून ते उगवणेत्याची वाढ होणे यांचे निरीक्षण दर दिवशी कॅलेंडरवर नोंदण्यातूनही काळाची संकल्पना विकसित व्हायला मदत होतेआधी कायनंतर कायकिती वाजता काय करायचे हे बोलण्यातूनही त्यासाठी मदत होतेएखादी गोष्ट करण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज मुलांनी करणे आणि मग ती करायला देऊन प्रत्यक्ष वेळ मोजून पडताळा घेणे अशा कृतीतूनही काळ या संकल्पनेपर्यंत मुलांना नेता येते.

क्रमवारिता : वय आणि आकार यांची संगती असतेच असे नाही हे मुलांना सातव्या वर्षानंतर कळू लागतेउंच माणसे बुटक्यांपेक्षा वयाने मोठीच असतात असे नाही हे समजण्याची सुरुवात असते.

वेगवेगळ्या लांबीच्या काड्याबाहुल्याठोकळे अशा वस्तू क्रमाने लावायला मुलांना अवश्य द्याव्यातलहान-मोठेपणातील फरकाकडे बघण्याची दृष्टी येण्यासाठी अशा कृतींचे महत्त्व खूप असते. “सर्वात छोटी वस्तू”, “सर्वात मोठी वस्तू” शोधायचे खेळ मुलांनी खेळायला हवेत.

हे सगळे खेळकृती देताना लक्षात ठेवायला हवेकी मुलामुलांमध्ये फरक असतो.

भाषाविकास : मुलामुलांमधला भाषाविकासाचा झपाटाही कमी-अधिक असतोआधी उल्लेखलेल्या विविध कृतींमधून भाषाविकासाला हातभार लागतोचहाताळायलापाहायलाकरायला काही मिळालेकी मुलांना त्याविषयी बोलावेसे वाटू लागतेत्यामुळे मुलांना समृद्ध अनुभव मिळणे फार महत्त्वाचे असतेपेरलेल्या ‘बी’च्या वाढीविषयीचिखलाच्या लाडूविषयीकाढलेल्या चित्राविषयी बोलायची इच्छा मुलांच्या मनात निर्माण होतेगाणी ऐकणे-म्हणणेचित्र वा वस्तू दाखवून त्याविषयी बोलणेगोष्ट ऐकणेलिहिलेले शब्द पाहणे अशा नानाविध कृती भाषाविकासासाठी महत्त्वाच्या ठरतात.

पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांचे म्हणणे रस घेऊन ऐकणे आणि मुलांशी बोलणे महत्त्वाचेगोष्टी ऐकण्यातून मुलांचा शब्दसंग्रह वाढतोवेगवेगळ्या संकल्पना त्यांना समजतातम्हणून गोष्टी सांगणे महत्त्वाचेएका संशोधनाचे निष्कर्ष असे आहेतकी ज्या मुलांची कल्पना स्वैर संचार करू शकतेत्यांची भाषेवरची पकड उत्तम असतेपुस्तकातला धडा शिकवत नसतानाही मुलांच्या भाषाविकासासाठी कितीतरी संधी उपलब्ध करून देता येतात.

मुलांना वाढवताना काय करायला हवे याविषयी विचार करण्यासारखे खूप काही पियाजेंनी आपल्याला दिले.पियाजेंचा दृढ विश्वास होताकी व्यावहारिक बुद्धिमत्तेतून आलेली भौतिक जगावरची मुलाची उत्स्फूर्त पकड,भावी घटनांचा वेध घ्यायला मुलाला निश्चित मदत करेलघटनांचे स्पष्टीकरण देऊ शकायला लागण्याच्या कितीतरी आधी हा वेध मूल घेऊ शकेल.