Skip directly to content

कौशीची फजिती

तलावा काठी झाडावर कौशी माकडीण रहायची. कौशीला आज झाडावर बसायचा कंटाळा आला होता. ती खाली उतरली. ऐटीत चालत चालत तलावाकडे गेली. तिथे एक माणूस शेंगा खात बसला होता. कौशीने हळूच माणसाजवळची थैली पळवली. तो माणूस हातात दगड घेऊन धावला. कौशीने झाडावर धाव घेतली. ती उंच फांदीवर जाऊन बसली. तिने थैलीतून शेंगांची पुडी काढली. आणि उघडून बघते तर काय? आत एकही दाणा नाही. नुसती शेंगांची सालंच उरली होती.

1. कौशी कुठे रहायची?

2. आज झाडावरून का उतरली?

3. माणूस कौशीच्या मागे का धावला?

४. कौशीची फजिती कशी झाली?